आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाला ब्रेक:स्थगिती थांबता थांबेना; 1 काेटीच्या आदविासी संकुलाच्या

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्तांतरानंतर विकास कामे थांबवण्याचे प्रकार बंद झालेले नसून, आदविासी घटकांसाठी मंजूर निधीला राेख लावल्यानंतर आदविासी संकुलाच्या कामाला स्थगिती दिली. ९९ लाख ९४ हजारांची प्रशासकीय मान्यता दिलेले हे काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. हे संकुल शिवसेनेकडील विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील पातूर तालुक्यात बांधण्यात येत आहे. या स्थगितीमुळे सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना संकुल उपलब्ध हाेणार नसून, त्यांना साेहळ्यांसाठी अन्य जागांचा शाेध घ्यावा लागणार आहे.

आदविासी घटकापर्यंत सुविधा पाेहाेचणे, त्यांचा सर्वांगीण विकास हाेणे, यासाठी याेजनांतून निधी मंजूर करून शासनाकडून कामे करण्यात येतात. यात सामुहिक लाभाच्या कामांचाही समावेश असताे. ग्रामीण भागात सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांसाठी विनामूल्य सभागृह नाहीत. परिणामी ग्रामस्थांना कार्यक्रमांचे आयाेजनच करता येत नाही, किंवा कार्यक्रमाची आैपचारिकता करावी लागते. त्यामुळे शासनाकडूनच संकुलाची उभारणी हाेण्यासाठी िनधीची मागणी झाली. पातूर तालुक्यात चाेंढी येथे आदविासी संकुलाच्या कामाला एप्रिलमध्ये मंजुरी दिली.

काय आहे दाेन आदेशात?
१) चाेंढी येथील आदविासी संकुलासाठी ९ जून २०२२ राेजी आदविासी विकास विभागाने ४२ लाख वितरीत करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला. प्रशासकीय मान्यता ९९ लाख ९४ हजार रुपयांची आहे.
२) सत्तांतर झाल्यानंतर अर्थात २१ जुलैला आदविासी विकास विभागाने राज्यातील सहा शासन निर्णयांना स्थगिती िदली. हे निर्णय ६ जूनला घेण्यात आले हाेते. स्थगिती देण्यात आलेल्या कामांमध्ये चाेंढी येथील आदविासी संकुलाचाही समावेश आहे. पुढील आदेशापर्यंत कामाला स्थगिती देण्यात आली आहे.

दर्जा काेण तपासणार ?
राज्यात शविसेनेतील शिंदे गट, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर कामांना स्थगिती देण्यामागील कारणांबाबत चर्चा रंगली. सूत्रांच्या अंदाजानुसार विविध कामांसाठी, प्रकल्पांकरता नविदि प्रक्रिया राबवताना निकवटर्तीय कंत्राटदाराला संधी देण्यात येणार आहे. मात्र स्थगिती मिळत असलेली अनेक कामे सुरू झालेली असून, काही कामे तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली. त्यामुळे भविष्यात कामांवरील स्थगिती उठवल्यानंतर ‘रसद’ची मागणी झाल्यास त्याचा परिणाम कामाच्या दर्जावर हाेणार नाही, याची जबाबदारी काेण घेणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

राजकीय किनाराची चर्चा
बाळापूरचे शविसेनेचे आमदार नितीन देशमुख आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत गेले व नंतर शविसेनेत परत आले. मात्र बाळापूर मतदारसंघात हाेणाऱ्या कामांना स्थगिती देण्यात येत आहे. अर्थात राज्यातील अनेक कामांनाही ब्रेक लावण्यात येत आहे. मात्र यात सर्वाधिक कामे बाळापूर मतदारसंघातील आहेत. यापूर्वी या मतदारसंघातील जलसंधारणाच्या १७ कामांना स्थगिती देण्यात आली. यातून ४०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते. त्यामुळे कामाच्यानिमित्ताने शविसेनेची राजकीय काेंडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...