आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाने केले मनपातील कर्मचाऱ्याला निलंबित:बदली झालेल्या विभागात रुजू न होणे भोवले; आणखी फाइल आयुक्तांकडे

श्रीकांत जोगळेकर l अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदली झालेल्या विभागात रुजु न होता रजेवर जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आयुक्त कविता द्विवेदी यांनी निलंबीत केले. दरम्यान आयुक्तांकडे चार ते पाच कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या फाईल्स गेल्या असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

आयुक्त कविता द्विवेदी यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थितीच रुळावर आणली नाही तर कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जात असून कर्मचाऱ्यांची थकीत देणीही दिली आहे. त्यामुळेच आयुक्तांना कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. मात्र काही कर्मचाऱ्यास यास अपवाद ठरतात. याचा फटका महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला बसला. भविष्य निर्वाह निधीचे काम पाहणारे सुधीर मिसुरकार यांची काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी सतीश वखारीया यांची नियुक्ती करण्यात आली.

मात्र सुधिर मिसुरकार यांनी विभागाचा कारभार सोपविण्यास तसेच कागदपत्र देण्यास विलंब केला. त्याच बरोबर ते शिक्षण विभागात रुजु झाले नाही. तर रेजवर गेले. हा प्रकार आयुक्ता पर्यंत पोचल्याने सुधिर मिसुरकार यांना आयुक्त कविता द्विवेदी यांनी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी निलंबित केले. त्यामुळे आता सुधीर मिसुरकार यांना सहा महिने 50 टक्के वेतन दिले जाईल. निलंबनाच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या फाईल्स आयुक्तांकडे

यापूर्वी आयुक्तांनी पाच कर्मचाऱ्यांना महापालिका कर्मचाऱ्यांच्या एका पतसंस्थेत झालेल्या घोटाळा प्रकरणात थेट निलंबीत केले होते. वास्तविकतेत ही पतसंस्था प्रशासनाच्या नियंत्रणाखाली नव्हती. या पतसंस्थेत केवळ महापालिकेचे शिक्षक, कर्मचारी होते. त्यामुळे पतसंस्थेत झालेल्या घोळाचा महापालिकेच्या घोटाळ्याशी थेट संबंध नव्हता. मात्र या घोटाळ्याची झळ महापालिका कर्मचाऱ्यांना बसल्यामुळे आणि तसा अहवाल आयुक्तांकडे गेल्या नंतर त्यांना संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करता येत होती.

मात्र दंडात्मक कारवाई ऐवजी आयुक्तांनी पाच कर्मचाऱ्यांना थेट निलंबीत केले. याच घोटाळ्यातील काही कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या फाईल्स आयुक्तांकडे पोचल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आयुक्त थेट बडतर्फीची कारवाई करणार की अन्य कारवाई करणार? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...