आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील 24 लघु प्रकल्पांपैकी 11 प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. प्रशासनाने नदी-नाल्या काठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. तर उर्वरित प्रकल्पातील जलसाठा 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
11 प्रकल्प वाहत आहे ओसंडून
जिल्ह्यातील मोठे, मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघु प्रकल्प महत्वाची भूमिका बजावतात. लघु प्रकल्पांमुळे शेकडो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. त्याच बरोबर जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली लागतो. आणि लघु प्रकल्पाच्या परिसरातील विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे लघु प्रकल्पही महत्वाचे ठरतात. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे 11 प्रकल्प ओंसडून वाहात आहेत. यात बार्शिटाकळी तालुक्यातील इसापूर, जनुना, घोटा, मोझरी, झोडगा, हातोला. पातूर तालुक्यातील गावंडगाव, पातूर, विश्वामित्री, मूर्तिजापूर तालुक्यातील वाई आणि अकोट तालुक्यातील पोपटखेडा टप्पा-2 हे लघु प्रकल्प ओंसडून वाहात आहेत. पोपटखेडा वगळता अन्य प्रकल्पांना दरवाजे नसल्याने या सर्व लघु प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहात आहे. तर पोपटखेड या लघु प्रकल्पाला दरवाजे असून दोन दरवाजे 2 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी, नाल्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
असा आहे जलसाठा
- काटेपूर्णा -86.35 --- 68.57 दलघमी - वान -- 81.95 --- 52.71 दलघमी - मोर्णा - 41.46 -- 32.30 दलघमी - निर्गुणा - 28.85 - -- 25.07 दलघमी - उमा - 11.68 -- 9.62 दलघमी - दगड पारवा -- 7.90 दलघमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.