आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी:आंदोलन देयक कमी केल्याशिवाय पाणीपट्टीचा भरणा करणार नसल्याचा दिला इशारा

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध भागातील नागरिकांना अवाजवी पाणीपुरवठ्याची देयके वितरीत करण्यात आली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून वाढीव पाणी देयकांची होळी केली. तसेच ती कमी केल्याशिवाय पाणी देयकांचा भरणा करणार नसल्याचा इशाराही दिला. ज्या नळजोडणी धारकांनी नळाचे मीटर बसवले आहे त्यांचे मीटर रिडींग न घेता मनपाने मनमानी पद्धतीने बिल वितरीत केली. ज्यांनी मीटर बसवले नाहीत त्याना मनमानी पद्धतीने देयके दिली. वार्षिक बाराशे रुपयांची आधीची पाणीपट्टीची पद्धत योग्य असून, सध्या दिलेल्या बेभाव पाणीपुरवठ्याचे देयक म्हणजे भाजप प्रणित अकोला मनपाची “झिझिया कर” वसुली आहे. आधी अकोलेकरांना रोज पाणीपुरवठा करा नंतर पाणी देयक वसुली करा, अशी मागणी शहर शिवसेनेने केली. मोर्चेकऱ्यांनी महापालिकेसमोर पाणी देयके कमी करा, हे पाप कुणाचे भाजपचे, आदी घोषणा दिल्या. शिवसेना शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात जाहीर होळी करून वाढीव पाणी देयकाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, गजानन चव्हाण, नितीन मिश्रा, शरद तुरकर, संतोष अनासने, तरुण बग़ैरे, बबलू ऊके, विजय परमार,योगेश बुंदेले, नितीन ताकवाले, सुनील दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी, रुपेश ढोरे, रोशन राज,अश्वनि नवले, मनोज बावीस्कर, संजय अग्रवाल, गणेश बुंदेले, सुरेश इंगळे,रवि अवचार, देवा गावंडे, विजय देशमुख, कैलाश खोरे, अमर भगत, आँशु तिवारी, अजय गावंडे,अरुण ठाकुर, शंकर बुंदेले, सोनू ठाकुर, प्रशांत गेड़ाम, नारायण मानवतकर, दुर्गा लोध, बाबा पांडे, संजय पांडे, सचनि बेतवार, रवि श्रीवाश, रवि मड़ावी, धर्मेंद्र राकेश, दशरथ मिश्रा, पितु मिश्रा, हेमंत मिश्रा,संजय खांदिलकर, दीपक साहू, महिला आघाडी, मंजूषा शेळके,अनीता मिश्रा, सुनीता श्रीवाश, नीलिमा तिजारे, वर्षा पिसोडे, लीला देव, आशा बारदिया, सविता बेटवाल, मंदा राठौर,सुनीता पांडे, कुंदन दुबे, रंजना हरणे, राधा कठोरे,रंजना श्रीवाश,बाळी शेलार,सीमा श्रीवाश, मीरा बरदिया,प्रमिला बेतवार, ज्ञानेश्वरी तराळे आदी सहभागी झाले होते.

राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व देयके जमा करुन वाढीव देयके कमी केली जातील, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले. रेल्वे स्थानकासमोरील जलकुंभांचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प

‘रेल्वेस्थानका समोरील दोन जलकुंभांवर स्काडा ऑटोमेशन प्रणाली उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे या दोन्ही जलकुंभांवरुन होणारा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार असून, २३ जूनला काही भागाला पाणीपुरवठा होईल,’ अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा सबलीकरणाची कामे सुरू आहेत. यापैकी काही पूर्ण झाली. पाणी पुरवठा योजनेचे जाळे मोठे असल्याने मजुरांकरवी कामे करणे अवघड होत आहे. योजनेवरील तांत्रिक कर्मचारी दर महनि्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळेच कमी मनुष्यबळ वापरुन पाणी पुरवठा योजनांमधील होणाऱ्या प्रक्रियेमध्ये स्वयंचलन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्कॉडा ऑटोमेशन पद्धतीमुळे पाण्याची गुणवत्ता व संयंत्रणाचे प्रमाणके ऑनलाइन पाहता येणार आहे. व आवश्यकतेप्रमाणे नियंत्रित करता येणार आहे. त्यामुळे प्रथम नव्या जलकुंभांवर ही प्रणाली बसवण्याचे काम टप्प्या-टप्प्याने केले जात आहे. रेल्वे स्थानका समोरील दोन जलकुंभांवर ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम मनपाने हाती घेतले. त्यामुळे या जलकुंभावरील पाणी पुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. २३ जूनला या भागाला होईल पाणी पुरवठा सोळाशे प्लॉट, अण्णाभाऊ सठे नगर, भीम चौक, मस्तान चौक, साधना चौक, संपूर्ण भोईपूरा, पुरपिडीत कॉलनी, कुरेशी कॉलनी, अकोट रोड, मुकुंदवाडी, राजीव नगर, हाजी नगर, अकबर प्लॉट, गायकवाड मोहल्ला या भागाला २३ जुन रोजी पाणी पुरवठा होईल. मात्र प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम पूर्ण न झाल्यास शुक्रवारी २४ जूनला या भागाला पाणी पुरवठा होईल. वाढीव पाणीपट्टी देयके वितरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने त्या देयकांची होळी केली. छायाचित्र ः नीरज भांगे. भाजप जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात महापालिकेने अकोलेकरांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली अवाजवी वसुली केली. आठवड्यातून फक्त दोन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. वास्तविक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात पाण्याची मुबलकता असून, सुद्धा अकोलेकरांना दररोज पाणी मिळत नाही, असा आरोपही राजेश मिश्रा यांनी केला. रेल्वे स्थानकासमोरील जलकुंभ परिसरात स्काडा ऑटोमेशन प्रणालीच्या कामास प्रारंभ झाला.

बातम्या आणखी आहेत...