आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:जिल्हा परिषदेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रुग्णवाहिकेचे करण्यात आले लोकार्पण

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आयोजित केला होता. रूग्णवाहिका १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून खरेदी करण्यात आल्या. जि. प.च्या आरोग्य विभागासाठी शासनाने निधी २०२१ च्या जुलैत मंजूर केला होता. यातून ४ रूग्णवाहिका करेदी केल्या. या रुग्णवाहिका पंचगव्हाण, बाभुळगाव, कुरुम, दहिहंडा आरोग्य केंद्रांना हस्तांतरित केल्या. लोकार्पण सोहळा २ एप्रिलला जि.प.मध्ये झाला.

यावेळी आमदार अमोल मिटकरी, जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, विरोधी पक्ष नेते, शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर, सदस्या पुष्पा इंगळे, हिरासिंग राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, डॉ. सुरेश असोले, राजेंद्र राणे, श्रीकांत ठाकरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...