आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील मान्सूनचे आगमन लांबणार; तापमान 44.2

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यामुळे अकोलेकर हैराण झाले आहेत. सगळीकडे पावसाची चातकासारखी प्रतीक्षा केली जात आहे. मात्र आता विदर्भात उष्णतेची लाट असल्याने मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र आता मान्सूनची पुढील वाटचाल रेंगाळल्याचे दिसत आहे. विदर्भात विविध जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सियसच्या पुढे राहत आहे. परिणामी नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन आता १० जूननंतरच होणार असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशवर ९०० मीटर आणि श्रीलंकेवर ३.१ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. वातावरण बदलामुळे पुढील एक दोन दिवस विदर्भात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात किंचित वाढ होईल. ६ व ७ जून राेजी भंडारा, गोंदिया वगळता उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. .

बातम्या आणखी आहेत...