आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:करडी संग्राहक तलावात दुसऱ्या दिवशी आढळले त्या दोन्ही मुलांचे मृतदेह

धाड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या करडी संग्राहक तलावात २७ जुलै रोजी सरीता पैठणे या विवाहीतेने आपल्या दोन मुलांसह उडी घेतली होती. दरम्यान, दि.जुलै रोजी दुपारी सरीताचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला होता. परंतु त्यांच्या दोन्ही मुलांचा शोध लागला नसल्याने नागरिकांसह प्रशासनाने पाण्यात शोध मोहीम राबवली असता आज दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात आढळून आले.

मृत सरीताच्या भावाने दिलेल्या तक्रारी वरुन धाड पोलिसांनी पती ज्ञानेश्वर पैठणे, त्याच्या आई व बहिणी विरुध्द गुन्हे दाखल करून ज्ञानेश्वर पैठणेला अटक केली आहे. परंतु त्याची आई व बहीण फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आज सकाळी करडी संग्रहक तलावात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने वैदीका व वंश या दोन मुलांचा शोध सुरु केला असता दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह या पथकाने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी आज अटक करण्यात आलेल्या आरोपी पती ज्ञानेश्वर पैठणे यास बुलडाणा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपासून या घटनेने धाड परिसरात चर्चेला उधाण आले होते. पुढील तपास ठाणेदार अनिल पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...