आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचा मृतदेह:कुरणखेड येथे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला

कुरणखेड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी १६ जूनला रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे येथील नाल्याला आलेल्या पुरामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील एक युवक जेसीबीमध्ये झोपलेला असताना वाहून गेला होता. दरम्यान घटनेनंतर केलेल्या शोधकार्यानंतर युवकाचा मृतदेह शनिवारी १८ जूनला सकाळी ७ वाजता आढळून आला. सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद वय १९ असे त्या मृत युवकाचे नाव आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील काटेपूर्णा नदीजवळ एक मोठा नाला आहे. येथे दोन दिवसांपासून जेसीबीद्वारे माती उपसण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम केले. रात्री काम झाल्यानंतर येथे कार्यरत बिहार येथील चार मजूर जेसीबीमध्येच झोपले होते. एका जेसीबीत दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर नाल्यातील पाण्याचा लोंढा जेसीबीपर्यंत पोहोचला. मशीन हळूहळू पाण्यात जात असल्याचा भास एकाला झाला. त्याने जेसीबीत सोबत असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या जेसीबीत झोपलेल्या मजूरांना उठवण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले. पण दुसरा झोपेत होता, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना जेसीबी उलटला. यावेळी सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद नामक युवक वाहून गेला होता. गुरुवारी रात्री पावसाच्या जोर अधिक असल्याने शोधकार्य हाती घेता आले नाही. शुक्रवारी दोन पथकाद्वारे शोधकार्य सुरू झाले. चार जेसीबी शोधकार्यात कार्यरत होते. माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकाला वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह आढळला. यासाठी रणजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख, शहाबाज शहा, संतोष गोगटे, ईश्वर हरणे सलिम मिर्झा, शेख नजिर शेख रहमान यांनी कामगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...