आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा मृतदेह सापडला:पूर्णा नदीत दोन दिवस चालली शोध मोहीम; आत्महत्येचे कारण अजून अंधारात

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला ते दर्यापूर मार्गावर असलेल्या म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरून 17 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका 35 वर्षीय युवकाने नदीत उडी घेतली होती. आपतकालीन पथकाच्या वितने दोन दिवस युवकाचा शोध घेणे सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री युवकाचा मृतदेह अंदुरा ते हाता दरम्यान पूर्णा नदीपात्रात तरंगताना आढळून आला आहे.

काय आहे घटना

घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून पोलिसांनी बचाव पथकाला बोलावले होते. पथकाने दोन दिवस युवकाचा शोध घेतला. युवकाने आपली कार एम. एच.15 ई. एक्स 5432 ही गाडी पुलाच्या बाजूला पार्क करून पूर्णा नदीत उडी घेतली होती. व्यक्तीचे नाव सुधीर रमेश तायडे (वय 35 वर्षे) असून तो अकोला शास्त्री नगर येथील राहवासी आहे.

घरच्यांना केला एसएमएस

सुधीर नाशिक येथे खाजगी कंपनीत कामाला होता. तो 6 ऑगस्ट रोजी अकोल्यात आला होता. मिळालेल्या माहिती नुसार सुधीर 17 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरून निघाला. त्याने घरच्या मोबाईलवर मेसेज करून आपण म्हैसांग येथील नदीत उडी घेत असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस व सुधीर तायडे घटनास्थळी पोहचले. सुधीर तायडे याने अशी टोकाची भूमिका का घेतली? या मागील कारण अद्याप कळलेले नाही.

मुलगी झाली पोरकी

मृत सुधीर हा अकोला शास्त्री नगर येथील रहिवासी होता. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहचले. आपतकालीन पथकाच्या वतीने दोन दिवस निरंतर शोध कार्य सुरू होते. तरुणाच्या मित्र-परिवाराने परिसरात गर्दी केली होती. सुधीर विवाहित असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...