आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेचे 2023-2024 वर्षाचे अंदाज पत्रक सुधारणांसह प्रशासकांकडे पोचले आहे. मात्र अद्यापही या अंदाज पत्रकाला प्रशासकांनी मंजुरी दिलेली नाही. चालु आर्थिक वर्ष संपुष्टात यायला केवळ 13 दिवस राहिले आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात महापालिकेला व्यवहार करताना अडचणी येणार आहेत.
महापालिकेत कार्यकारीणी नाही. कार्यकारीणी अस्तित्वात असली की प्रशासनाकडून अंदाज पत्रक तयार केल्या नंतर स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. स्थायी समितीच्या सभेत सुचवलेल्या बदलांसह अंतिम मंजुरीसाठी अंदाज पत्रक सर्व साधारण सभेकडे पाठवले जाते. सर्व साधारण सभेत अंदाज पत्रकावर चर्चा झाल्या नंतर अंदाज पत्रकाला मंजुरी दिली जाते.
मागील दोन वर्षापासून 31 मार्चच्या आधी अंदाज पत्रकाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी अंदाज पत्रकाला मंजुरी देताना विलंब झालेला आहे. परिणामी नविन आर्थिक वर्ष सुरु झाल्या नंतर व्यवहार करताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी तर कार्यकारीणी अस्तित्वात नसल्याने अंदाज पत्रकाला मंजुरी देण्याचे अधिकार प्रशासकांनाच आहे.
लेखा विभागाने 2023-2024 चे अंदाज पत्रक तयार केल्या नंतर आयुक्तांकडे पाठवले. आयुक्तांनी यात बदल सुचवले. सुचवलेल्या बदलांसह लेखा विभागाने हे अंदाज पत्रक पुन्हा आयुक्तांकडे सादर केले. आयुक्तांकडेच प्रशासक म्हणून पदभार असल्याने एकीकडे आयुक्त तर दुसरीकडे प्रशासक म्हणून कविता द्विवेदी यांना मंजुरी द्यावी लागणार आहे. ही मंजुरी केव्हा दिली जाते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अंदाज पत्रकाबाबत उत्सुकता
दरवर्षी पदाधिकारी प्रशासनाने सादर केलेल्या अंदाज पत्रकात उत्पन्नाचे आकडे वाढवुन खर्चाचे आकडे वाढवतात. त्यामुळे हे अंदाज पत्रक केवळ फुगीर आकड्यांचे ठरते. त्यामुळेच यावर्षी हे अंदाज पत्रक रिअॅलिस्टिक राहणार की फुगीर आकड्यांचे ही बाब पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
या येतील अडचणी
31 मार्चपर्यंत अंदाज पत्रकाला मंजुरी न मिळाल्यास प्रशासनाला नविन आर्थिक वर्षात व्यवहार करताना अडचणी जातील. कोणत्याही प्रकारचे देयक देताना बजेट मंजुर करुन घ्यावे लागले. तसेच कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मार्च महिन्यातच द्यावे लागेल. अन्यथा जो पर्यंत अंदाज पत्रक मंजुर केले जात नाही, तो पर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.