आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाैऱ्याची औपचारिकता:केंद्रीय पथकाने बंदद्वार घेतली आढावा बैठक

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंशीय जनावरांमधील लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी उपाय सुचवण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या दाैऱ्याची औपचारिकता पार पाडण्यात आल्याचे बुधवारी दिसून आले. लम्पी चर्मरोग प्रभावित गावांना, स्थळांना भेटी न देता केवळ बंदद्वार आढावा बैठक घेत साेपस्कार पूर्ण करण्यातच धन्यता मानण्यात आल्याचे पाहावयास िमळाले. बैठकीत पथकाने काही उपाय याेजना, सूचना केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी आजाराने थैमान घातले असून, अद्यापही प्रादुर्भाव आटाेक्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यात व शेतीकामात जनावरांची महत्वाची भूमिका असते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर आधीच अस्मानी संकट ओढवले आहे.

बातम्या आणखी आहेत...