आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​महानच्या जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित:शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला आहे.अकोला पाणी पुरवठा योजनेचे अकोला येथून ३२ किमी अंतरावर महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी ६५ एमएलडी आणि २५ एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. ६५ एमएलडी केंद्रातून ९०० मिमी, तर २५ एमएलडी केंद्रातून ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा होतो. जलशुद्धीकरण केंद्रातील पंप २४ तास सुरू असतात. त्यामुळेच पाणी पुरवठ्यात खंड पडू नये, यासाठी या ठिकाणी एक्स्प्रेस फिडरही लावण्यात आले. मात्र १० सप्टेंबरला रात्री शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील वीज रात्रीच खंडीत झाली होती. मात्र खंडीत झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला. परंतु ११ सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजता पुन्हा वीज पुरवठा खंडीत झाला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मेजर फॉल्ट असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागेल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...