आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:थंडी ओसरली : दोन दिवसात तापमान 13 वरून 18 अंशांवर

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अंशत: ढगाळ वातावरण राहत असून थंडी कमी होताना दिसत आहे. किमान तापमानात रविवारीही दोन अंशांनी वाढ होऊन पारा १८.० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. दोन दिवसात किमान तापमानात तब्बल पाच अंशाने वाढ झाली आहे. २ डिसेंबरला पारा १३.५ अंशावर होता. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वाढलेली थंडी डिसेंबरच्या सुरुवातीला काही प्रमाणात कमी होत आहे.

काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी जाणवत आहे. रविवारी, ४ नोव्हेंबरला किमान तापमान १८.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. अशातच राज्याच्या विविध भागात १० ते १३ डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल असा अंदाज परभणी जिल्ह्यातील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. दरम्यानच्या काळात बुलडाणा, अकोला जिल्हयातील काही तुरळक भागात रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...