आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर काही पालक आपल्या पाल्यांना कचरा उचलण्यासाठी पाठवतात. ही बाब आयुक्त कविता द्विवेदी यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेत शिक्षणाधिकारी आणि स्वच्छता विभाग प्रमुखांना पाठवून पालकांशी संवाद साधायला लावला. शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुल्ताना आणि आरोग्य स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांनी संबंधित बालकांच्या पालकांशी संवाद साधून बाल मजुरी थांबवून लहान मुले व मुली यांना शिक्षणासाठी पाठवण्या संदर्भात प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच बालमजुरांना शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर पाल्यांना मनपाच्या शाळांमध्ये शिक्षण, गणवेश आणि पाठ्यपुस्तके विनामुल्य दिली जातील, अशी माहितीही दिली. या वेळी आरोग्य निरीक्षक प्रवीण खांबोरकर, जितेंद्र गोराने, जोगेंद्र खरारे आदी उपस्थित होते. तसेच आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना बालमजूर शाळेत जात आहे किंवा नाही यावर लक्ष देण्याची सूचना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.