आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:बनावट कागदपत्रावर कंपनीच घेतली ताब्यात; उद्योजकाची 70 कोटींची फसवणूक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनी खरेदीच्या व्यवहारात उद्योजकाची फसवणूक करीत बनावट कागदपत्र तयार करून कंपनीच नावावर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात वणी रंभापूर येथील जे.जे. स्पून कंपनीचे संचालक नितीन हरिदास पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने अमरावतीए नागपूर व औरंगाबादसह इतर ठिकाणाच्या संशयित आरोपीविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

नितीन पाटील यांची वणी रंभापूर येथे जे.जे. स्पून नावाने कंपनी आहे तर रतनलाल प्लॉट येथे त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. ही कंपनी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी ती विकण्यासंदर्भात अमरावती येथील संजय शंकरराव जाधव (६०, रा.मांगीलाल प्लॉट), गोपाल त्रिलोकचंद अग्रवाल (४५), श्याम त्रिलोकचंद अग्रवाल (४०) दोघेही राहणार टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद (संभाजीनगर) यांच्यासोबत व्यवहार केला होता. ६० ते ७० कोटीमध्ये हा व्यवहार झाला व त्यातील काही रक्कम नितीन पाटील यांना संबंधितांनी दिली. त्यानंतर संबंधितांनी बनावट दस्तऐवज तयार केले व नितीन पाटील यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करीत कंपनी ताब्यात घेतल्याचे भासवले. कंपनी कायद्यानुसार मुंबई येथे कंपनी स्वतःच्या नावावर नोंदणीही करून घेतली. ही बाब नितीन पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली व सर्व दस्तऐवज सादर करून झालेल्या फसवणुकीसंदर्भात गुन्हे दाखल करण्याची वनिंती पोलिसांना केली. पोलिसांनी मात्र, या प्रकरणात गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे नितीन पाटील यांनी कलम १५६ (३) नुसार न्यायालयात याचिका दाखल केली.

आैरंगाबाद, अमरावती, दिल्ली, नागपूर येथील आराेपींचा समावेश संजय शंकरराव जाधव (६०, रा.मांगीलाल प्लॉट अमरावती), गोपाल त्रिलोकचंद अग्रवाल (४५), श्याम त्रिलोकचंद अग्रवाल (४०) दोघेही राहणार टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद (संभाजीनगर), कंपनी सचिव सी.एन. वनििता राणी (दिल्ली), नितीन रमेशराव भुसारी (नागपूर), पूजा तिवारी (इंदूर) आणि अनुज गुप्ता (दिल्ली) या आरोपीविरुद्ध न्यायालयाने सिव्हिल लाइन्स पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...