आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:अंतरासाठीची अट शिथिल; सामूहिक अर्ज, स्थानिक प्राधिकरणाच्या ठरावाचा पर्याय

अकाेला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करण्यासह अन्य कारणास्तव वीटभट्टीसाठीचे ३६५ अर्ज नाकारण्यात आल्यानंतर आता अंतराबाबत सामुहिक अर्ज पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तसेच स्थानिक प्राधिकरणाचा ठराव (ग्रामपंचायत) ना हरकत म्हणून सादर करावा लागणार आहे. सुधारित हमी पत्र िदल्यास अर्ज मंजूर हाेणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना िदला आहे. त्यामुळे विटांचे उत्पादन कमी हाेणार नसून, बांधकाम क्षेत्राला दिलासा िमळणार आहे. तसेच मागणीच्या तुलनेने पुरवठा हाेणार असल्याने ग्राहकांनाही जादा दराने वीट खरेदी करावी लागणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर ठिकठिकाणी वीटभट्ट्या आहेत. मात्र अनेक िठकाणी प्रदूषणासह अन्य नियमांचे पालन हाेत नसल्याचे िदसून येते. वीटभट्टींच्या परवानगीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास हाेऊ नये, यासाठी पर्यावरण िवभागाची अनुमती असणे बंधनकारक आहे. याबाबत राज्य शासनाने सन २०१६ मध्ये अधिसूचनाही जारी केली हाेता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२२ मध्ये आदेश जारी करून सूचनाही केल्या हाेत्या.

आठ दिवसांत अर्ज निकाली काढण्याचे आदेश
वीटभट्टीसाठीच्या अर्जावर निर्णय घेण्यास प्रदूषण िनयंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडून उशीर हाेत आहे. त्यामुळे आता अर्जदारांचा आॅनलाइन अर्ज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून आठ दिवसाच्या आत अर्जावर निर्णय घेऊन ना हरकत प्रमाणपत्र (एनआेसी) देण्यात यावे. तसेच एखादा अर्ज नामंजूर केल्यास त्याबाबतची कारणे स्पष्टपणे नमूद करावीत; जेणेकरून अर्जदारांना त्रुटींची पूर्तता करणे साेयीचे हाेईल, असेही िजल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्प‌ष्ट केले आहे.

केवळ २५ अर्जच मंजूर : िजल्ह्यात अकाेट, तेल्हारा, मूर्तिजापूर,अकाेला, बाळापूर तालुक्यात सर्वाधिक वीटभट्ट्या आहेत. येथून िवदर्भ, मराठवाड्यातील अनेक िजल्ह्यात वीट पुरवठा हाेताे. यंदा वीटभट्यांसाठी २५ अर्जांनाच मंजुरी दिली. ३६५ अर्ज नाकारले. मात्र आता अंतराची अट शिथिल करून हमी पत्रातही सुधारणा करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...