आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:दामिनी पथकाने शहरातील 96 संशयितांना दिली समज

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दामिनी पथकाने १५ दिवसात शहरात संशयितरित्या वावरणाऱ्या ९६ जणांची चौकशी करुन त्यांना समज देऊन सोडले. दामिनी पथकाने संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग करून महिलांविरूद्ध होणाऱ्या घटनांना आळा बसेल, या उद्देशाने १२ जनजागृती कार्यक्रम घेतले. महाविद्याय, शाळा, शिकवणी वर्ग, महिला आश्रमात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १०३ ठिकाणी भेटी दिल्या. पीडित महिलांनी किंवा संकटात सापडलेल्या महिलांनी तक्रार केल्यास दामिनी पथक त्यांची मदत करेल.

त्यासाठी ७४४७४१००१५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दामिनी पथक प्रमुख पोलिस निरीक्षक उज्वला देवकर यांनी केले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख पोलिस निरीक्षक उज्वला देवकर, पोलिस शिपाई सोळंके, प्रिती मोहोड, रिना गावंडे, शुभांगी घावट, नारायण पितळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...