आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:चिंचोली गणू येथे ‎ मृतदेह आढळला ‎

वाडेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंचोली गणू शेत‎ शिवारातील धाडी बल्लाडी येथील‎ जंगलात कुजलेल्या अवस्थेतील‎ अनाेळखी पुरुषाचा मृतदेह‎ आढळल्याची घटना शुक्रवारी‎ दुपारच्या सुमारास उघडकीस आली.‎ पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस‎ ठाण्याअंतर्गत एका अनोळखी पुरुषाचा‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे‎ ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या‎ प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी‎ केली असता मृतकाची ओळख‎ निष्पन्न झाली नाही.

दरम्यान चान्नीचे‎ ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक‎ गणेश महाजन, हवालदार शिंदे यांनी‎ घटनास्थळी जावून प्राथमिक चौकशी‎ व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय‎ तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय येथे‎ पाठवला असून, अधिक तपास चान्नी‎ पोलिस करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...