आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:शिक्षण विभाग पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटी काढल्या ; सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर लक्ष

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेतील त्रृटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनातील वादामुळे ब्रेक लागल्यानंतर आता ही प्रक्रिया तुर्तास तरी पुढे सरकरली आहे. या त्रृटी निकाली काढण्यात आल्या तरी यावर सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले कि नाही, हे पुढील सप्ताहात हाेणाऱ्या पदोन्नती समितीच्या सभेत दिसून येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) विविध संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदोन्नतीची प्रक्रिया प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपूर्वी करणे गरजेचे असल्याने पदोन्नती समितीची सभा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सावित्रीबाई राठोड यांनी पदोन्नती प्रक्रियेच्या प्रस्तावाची फाईल स्वतःकडे ठेवली असल्याने ३० मे रोजी या बाबतची सभा झाली नाही. परिणामी सीईओंनी उपाध्यक्षांना पत्र देत पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहिल, असे नमूद केले हाेते. त्यानंतर हे प्रकरण अध्यक्षांपर्यंत पोहोचले होते.

चौकशी झाली काय? पदोन्नतीबाबत उपाध्यक्षा व जि.प. प्रशासनामध्ये पत्रांची देवाण-घेवाण झाली होती. नंतर अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी शिक्षण विभागाच्या फाइलमध्ये काही बाबींचा उहापोह केला होता. त्यांनी उपाध्यक्ष-शिक्षण सभापतींच्या अभिप्रायाचा संदर्भ दिला. पदोन्नती प्रक्रियेत कथित गैरव्यवहार करणे, अपात्र व्यक्तिंना पदोन्नती देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचेही नमूद केले होते. आता . त्यामुळे शिक्षण सभापतीच्या मागणीनुसार या प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले होते. आता नेमकी चौकशी झाली काय, ही बाब पदोन्नती समितीच्या बैठकित स्पष्ट होणार आहे.

रिक्त पदांची संख्या वाढणार : शिक्षण विभागातील ४ संवर्गातील पदे पदोन्नतीद्वारे भरणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक (उर्दू) २९, मुख्याध्यापक (मराठी) ६७, विस्तार अधिकारी (श्रेणी २)- ४, विस्तार अधिकारी १२ पदे रिक्त आहेत. त्रृटी काढण्यात अल्यानंतर काही विस्तार अधिकाऱ्यांची पदे वाढली आहेत. त्रृटी दूर करण्याचे काम शिक्षण विभागाकडून पूर्ण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...