आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरींनी मागवला जलकुंभाचा अहवाल:मनपाला 2 दिवसात रिपोर्ट देण्याच्या सूचना; 3 जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा प्रश्न

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे सेक्रेटरी श्रीकर परदेशी यांनी महापालिका प्रशासनाला शहरातील जुन्या झालेल्या जलकुंभाबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचा सुचना दिल्या आहेत.

'दिव्य मराठी'ने २० ऑगस्ट रोजी शहरातील तीन जलकुंभ क्षत्रीग्रस्त या आशयाचे वृत्त प्रकाशित करुन या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या विषयाची थेट मंत्रालयानेच आता दखल घेतली आहे.

शहरातील नविन बसस्थानका मागील दोन तसेच जुने शहरातील शिवनगर भागातील एक अशा तीन आणि हद्दवाढी नंतर महापालिकेच्या ताब्यात आलेला खडकी भागातील एक जलकुंभ क्षतीग्रस्त झाला आहे. जलकुंभाच्या पायऱ्या तुटल्या असून कॉलमचे प्लॉस्टर निघाले आहे तसेच लोखंडी बार बाहेरुन दिसत आहेत. याच बरोबर नविन बसस्थानका मागील जलकुंभाच्या बेसमेन्ट १२ महिने पाणी साचते. या सर्व बाबींमुळे हे जलकुंभ धोकादायक झाले आहेत. त्यामुळे या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन अहवालानुसार यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

या जलकुंभांकडे दुर्लक्ष केल्यास आणि एखादवेळी अपघात झाल्यास जिवित तसेच वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने दिव्य मराठीने आर्किटेक्ट नविन घोटकर यांचे जलकुंभाबाबतचे मत जाणून घेतले होते. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केल्या नंतर खळबळ उडाली होती. या वृत्ताची माहिती थेट मंत्रालया पर्यंत पोचली. उपमुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरींनी सुचना दिल्या नंतर आता महापालिका प्रशासनही खडबडुन जागे झाले असून मंगळवारी याबाबतचा अहवाल उपमुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरींना पाठवला जाणार आहे.

डिपीआरची अंमलबजावणी केव्हा?

प्रशासन वारंवार अमृत टप्पा २ च्या डिपीआर मध्ये जलकुंभाचे ऑडीट समाविष्ट करुन घेणार असल्याचे सांगत आहे. मात्र हा डिपीआर तयार केव्हा होईल? त्याला मंजुरी केव्हा मिळेल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवणे आदी सोपस्कार केल्या नंतर स्ट्रक्चरल ऑडीट होईल. त्यामुळे याला अनेक महिने लागतील. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पाहणीनंतर अहवाल देणार

शहरातील जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडीट बाबतची माहिती मंत्रालयाने मागवली आहे. मी स्वत: जावून जलकुंभाची पाहणी करेन त्यानंतर तसा अहवाल मंत्रालयाला पाठवेन. - जुम्मा प्यारेवाले, उपायुक्त मनपा

स्ट्रक्चरल ऑडीट समाविष्ट

महापालिकेने अमृत योजनेच्या टप्पा-२ च्या डिपीआर मध्ये जुन्या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडीट समाविष्ट केले आहे. त्यावेळी स्ट्रक्चरल ऑडीट होणार असले तरी तुर्तास डिपीआर तयार करणाऱ्या अभियंत्यांकडून जलकुंभाबाबत माहिती घेवून तसा अहवाल मंत्रालयाला पाठवला जाईल.- हरिदास ताठे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

बातम्या आणखी आहेत...