आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग बांधव:राख्यांची निर्मिती आणि विक्रीमधून दिव्यांगांना मिळाली हक्काची कमाई

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगात कलागुण असल्यास आणि शिकण्याची वृत्ती असल्यास कुठलेही कार्य अवघड नाही. अकोल्यातील दिव्यांग बांधव यांचे उत्तम उदाहरण आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी दिव्यांगांसाठी राख्या निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले. यात दिव्यांग बांधव आणि महिलांनी तब्बल ११ हजार राख्या तयार केल्या. याची विक्री शहरात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.

दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे १ ते ४ ऑगस्ट दरम्यान दिव्यांग बांधवांसाठी राखी निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. दिव्यांगांना शिक्षणासह रोजगार मिळावा या हेतूने कार्यशाळेत दिव्यांग बांधवांनी ११ हजार राख्यांची निर्मिती केली. या राख्या दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे विविध शाळा, महाविद्यालय व बाजारपेठेत स्टॉल लावून विकल्या जाणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने सुद्धा या राख्या देशाच्या विविध शहरात पाठवल्या जात आहे.या राख्यांना चांगली मागणी लाभत आहे. राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांगांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार असल्याने विविध सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालय व महिला वर्गाद्वारा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रा. अरविंद देव, प्रसाद झाडे, भारती शेंडे, अनामिका देशपांडे,

दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या परिश्रमातून राख्या तयार केल्या आहे. विविध साहित्यातून तयार केलेल्या सर्व राख्या आकर्षक आहेत. या राख्या अधिका-अधिक खरेदी करून दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन द्यावे. विशाल कोरडे, संस्थापक, दिव्यांग सोशल फाउंडेशन.

बातम्या आणखी आहेत...