आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने काही प्रमाणात लसीकरण वाढले असले तरी अद्याप राज्याच्या तुलनेत अकोला जिल्हा लसीकरणात पिछाडीवरच आहे. राज्यातील एकूण जिल्ह्यापैकी अकोला जिल्हा लसीकरणात ३१ व्या स्थानी आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. आरोग्य विभागातर्फे लसीकरण वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असले तरी लसीकरणात आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाला मिळणारा ढिम्म प्रतिसाद लक्षात घेता आरोग्य विभागाने सुमारे निम्मे लसीकरण केंद्र बंद केली होती. गेल्या महिन्यात प्रतिदिवस सरासरी ५०० डोसचे लसीकरण होत होते. त्यामध्ये आता काहीशी वाढ झाली असून दिवसाला १२०० ते १५०० डोसेसचे लसीकरण होत आहे. असे असले तरी ड्यू डोसही संख्या लक्षात घेता हे लसीकरण कमी आहे. कोविशिल्डचा १० दिवस पुरेल एवढा साठा : जिल्ह्यात लसीकरणाला प्रतिसाद कमी असल्याने अतिरिक्त लसीचा साठा करून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे कुठेही मुदत संपलेली लस सद्यःस्थितीत नाही. उलट कोविशिल्ड लसीचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच साठा आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून कळते. जिल्हा ३१ व्या स्थानावर ः राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अकोला जिल्हा अद्यापही पिछाडीवर आहे. लसीकरण वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने विविध मोहिमा हाती घेतल्या असल्या तरी आवश्यक तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा ३१ ते ३३ व्या स्थानावर राहत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.