आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनात दिलासा:जिल्ह्याची अनलॉककडे वाटचाल; उद्यापासून 7 ते 4 पर्यंत सर्व दुकाने सुरू

अकोला14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • लग्नात 50, तर अंत्यसंस्कारासाठी 25 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

जिल्ह्यात काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी लागू केलेले निर्बंध शनिवारी आणखी शिथिल करण्यात अाले. जिल्ह्याचा काेराेना पाॅझिटिव्हिटी दर ८.९६ टक्क्यांपेक्षा कमी झाला असून, आता जिल्ह्याची वाटचाल संपूर्ण अनलाॅकच्या दिशेने सुरू झाली अाहे. त्यानुसार ७ जूनपासून जीवनावश्यक सेवांतर्गत असलेली दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत खुली ठेवता येणार अाहेत. मात्र बिगर अत्यावश्यक सेवेची दुकाने साेमवार ते शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असून, ही दुकाने शनिवार व रविवारी पूर्णत: बंद राहणार अाहेत. तसेच हॉटेल्स ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन पूर्वपरवानगीने घेता येणार अाहेत. तसेच क्रीडांगणेही पहाटे ५ ते ९ पर्यंत सुरू राहणार अाहेत. जिल्ह्यात सायंकाळी ५ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू असेल.

जिल्ह्यात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने वर्गीकरण केले अाहे. त्यानुसार अकाेला जिल्हा लेव्हल ३ मध्ये समाविष्ट असल्याने निर्बंध आणखी शिथिल केले अाहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी रात्री ९ वाजता जारी केला. हा आदेश ७ जूनपासून पुढील अादेशापर्यंत लागू राहणार अाहे.

केव्हा काय राहणार सुरू

 • जीवनावश्यक : सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत साेमवार ते रविवार या काळात सर्व प्रकारची जीवनावश्यक साहित्य विक्रीची दुकाने सुरू राहणार अाहेत.
 • बिगर जीवनावश्यक : सकाळी ७ ते ४ या वेळेत साेमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सुरू राहणार अाहेत. यात कापड, इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य सर्व दुकानांचा समावेश राहणार अाहे.
 • हॉटेल्स : रेस्टाॅरंट, हाॅटेल्स, खानावळी साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत ५० टक्के आसन क्षमतेसह सुरू राहतील. त्यानंतर शनिवार व

रविवारी पार्सल सेवा सुरू ठेवता येईल.

 • क्रीडांगण : राेज सकाळी ५ ते ९ पर्यंत सार्वजनिक िठकाणे, क्रीडांगणे, माेकळ्या जागा, उद्याने, माॅर्निंग वाॅक करता येणार अाहे.
 • कार्यालये : सर्व प्रकाराची खासगी अस्थापना, कार्यालये दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. तसेच शासकीय-निमशाकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहणार अाहे.

जिल्ह्यात या सेवा राहणार सुरू

 • ई- काॅमर्स वस्तू व सेवा, जीम, व्यायाम शाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा वेलनेस सेंटर एकूण क्षमतेच्या ५० टक्के पूर्वी नाेंदणीसह खुली ठेवता येणार अाहेत. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, मालवाहतूक सुरू राहणार अाहे. मात्र लेव्हल - ५ मध्ये जिल्ह्यातून येे-जा हाेत असल्यास ई-पास बंधनकारक राहणार अाहे.
 • उद्याेग : उत्पादन क्षेत्र, एमआयडीसी नियमितपणे (नियमांचे पालन करून) सुरू राहणार अाहे. मात्र अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेले उद्याेग ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.

हे राहणार नियमितपणे सुरू

 • सर्व वैद्यकीय सेवा, रुग्णालये, पशुचिकित्सा, मेडिकल स्टाेअर्स, अाॅनलाइन औषध सेवा नियमितपणे सुरू राहील. तसेच सर्व प्रकारची शासकीय, कार्यालये, बँका, वित्तीय सेवा, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या कार्यालयांना यातून सूट राहणार अाहे.

अशाही मर्यादा

 • लग्न समारंभ ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात करता येणार असून, यासाठी मात्र शहरासाठी उपविभागीय अधिकारी आणि तालुकास्तरावर संबंधित न.प.चे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार अाहे.
 • अंत्यविधी २० जणांच्या उपस्थितीत करता येणार अाहे.
 • बैठका : बैठका, सभा, अामसभा आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत घेता येणार अाहेत.
 • बांधकाम : केवळ बांधकाम स्थळी असलेले प्रत्यक्ष मजूर किंवा बाहेर आणण्याचे असल्यास दुपारी ४ पर्यंत कामे करता येणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...