आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय आयुक्तांकडून विविध विषयांचा आढावा:गोवर, लम्पी आजारासह पदवीधर मतदार नोंदणी विषयावरही चर्चा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गोवरची साथ, लम्पी आजार, पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम, मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अशा विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी 1 डिसेंबर रोजी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपवनसंरक्षक अर्जुना के आर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी,डॉ. तुषार बावने, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांनी आढावा घेतांना साथीचे आजार गोवर व कोविड बाबत माहिती घेतली. जिल्ह्यात रुबेलाचे 41 तर गोवरचे 17 असे एकूण 58 रुग्ण असुन त्यांचेवर उपचार सुरू आहेत. हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य आहे. त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेण्यात यावी. या संदर्भात आवश्यक औषधांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात लम्पि चर्मरोगामुळे 32 हजार गुरे बाधीत झालीत. त्यात उपचारानंतर 28 हजार 860 जनावरे पूर्ण बरी झाली असून जिल्ह्यात 2 लाख 56 हजार 631 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. 1914 जनावरे मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत म्हणजे 1420 मृत जनावरांच्या पशुमालकांसाठी 3 कोटी 44 लाख रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली असून 3 कोटी 43 लाख रुपयांच्या भरपाई रकमेचे पशुपालकांच्या बॅंक खात्यात प्रत्यक्ष वितरण झाले आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 32 हजार मतदारांची नोंदणी झाली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात होत असलेला मतदार पुनरिक्षण कार्यक्रम, तसेच गांधीग्राम पुलासंदर्भात अकोटकडे जाणाऱ्या वाहतुकीचा पर्यायी मार्ग याबाबतही माहिती देण्यात आली. पुरवठा विभागामार्फत होत असलेले धान्य वितरण, ई- पॉस मशिन बाबत प्राप्त तक्रारी याबाबतही आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार वाहनाला त्यांच्या हस्ते झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले

बातम्या आणखी आहेत...