आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; शहरात आज विविध कार्यक्रम

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन आरडीसी संजय खडसे यांनी केले.

सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण. १० ते ११.३० वाजेपर्यंत शास्त्री स्टेडियम येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत फ्लॅश मॉब. पोलिस बॅण्ड पथक व संकल्प प्रतिष्ठान ढोलताशा पथकाद्वारा देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम.साेमवारी सकाळी १० ते ११ या वेळेत अशोक वाटिका चौक, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉट चौक, हुतात्मा चौक, सिव्हील लाईन चौक, भगतसिंग चौक, गांधी चौक या ठिकाणी एकता बॅण्ड पथकाद्वारे देशभक्तीपर गीत वादन कार्यक्रम हाेणार आहे. सायंकाळी ७ पासून भारतरत्न डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृहात देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम.

बातम्या आणखी आहेत...