आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतकऱ्याने घोड्यावरून काढली लेकीची वरात‎ ; वधूची वरात बघण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी‎

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजू‎ अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील‎ खेर्डां खुर्द गावातील एका शेतकरी पित्याने आपल्या‎ मुलीची वरात घोड्यावरून काढली. मुलगी‎ मुलापेक्षा कमी नाही. ती एक नाहीतर दोन घर‎ प्रकाशमान करते. त्यामुळे आपल्या लाडक्या‎ लेकीला धुमधड्याक्यात निरोप देण्यासह, समाजाला‎ स्त्री-पुरूष समानतेचा संदेश या कुटूंबाने दिला आहे.‎ खेर्डा खुर्द येतील शेतकरी गोवर्धन तान्हुजी‎ सदाशीव व त्याच्या पत्नी कल्पना सदाशीव यांनी‎ मुलीच्या जन्माच्या वेळीच तिच्या उज्ज्वल‎ भविष्याचे स्वप्ने बघितली होती. दोन भावंडात‎ गोवर्धन यांची मुलगी सपना मोठी झाली. तिने‎ उच्चशिक्षण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच सपनाचे‎ लग्न नाशिक येथे जल संसाधन मंत्रालयात‎ नोकरीवर असलेल्या प्रशिश विजय खंडारे‎ यांच्यासोबत जुळले. या वेळी सदाशीव कुटूंबाने‎ आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढण्याचे‎ ठरवले. त्यानुसार लग्नाची तयारी करण्यात आली. ५‎ जूनला हा विवाह सोहळा झाला. या वेळी वधू‎ लग्नमंडपी मुलाप्रमाणे घोड्यावरून आली.‎ घोड्यावरून जाणाऱ्या वधूची वरात बघण्यासाठी‎ जवळपासच्या गावकऱ्यांनी परिसरात मोठी गर्दी‎ केली होती.‎ उच्चशिक्षण देऊन वाढवले‎ गोवर्धन सदाशीव यांना दोन मुलं पंकज व धीरज‎ आहे. त्यांनी मुलगी सपना हिलाही मुलांप्रमाणे‎ उच्चशिक्षण दिले. गोवर्धन यांची जलदूत म्हणून‎ गावामध्ये ओळख आहे. यापूर्वी त्यांनी‎ उन्हाळ्यामध्ये स्वत:च्या शेतातून पाइपलाइन टाकून‎ गावाची तहान भागवली होती. संपूर्ण गावाला‎ दुष्काळ परिस्थितीमध्ये पाणी पुरवले होते. त्यामुळे‎ त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलदूत सन्मान‎ प्रदान केला होता.‎ जन्मावेळीच केला‎ होता निश्चय‎ मुलीचा जन्म झाला‎ त्यावेळी तिच्या लग्नाची‎ वरात घोड्यावरून‎ काढण्याचा निर्णय घेतला‎ होता. त्यानुसार ५ जून रोजी‎ लग्न समारंभ झाला.‎ आजच्या काळात मुली‎ कुठल्याच क्षेत्रात कमी‎ नाही. तिलाही सर्व प्रकारचा‎ आनंद साजरा करण्याचा‎ अधिकार आहे. हाच संदेश‎ मला समाजाला द्यायचा‎ होता.‎ गोवर्धन सदाशीव,‎ वधूपिता‎ घोड्यावरुन जाणारी वधूची वरात

बातम्या आणखी आहेत...