आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीची वरात घोड्यावरून:अकोल्यातल्या अनोख्या लग्नाची चर्चा; मुलगा-मुलगी भेद न मानता वधुपित्याचा सामाजिक संदेश

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी म्हणजे ओझे, अशी धारणा समाजात रुढ होती; पण ही धारणा आता समाजातीलच काही डोळस व्यक्तींमुळे बदलत आहे. आपल्या समाजात लग्नात घोड्यावर केवळ मुलालाच बसवले जाते; पण एका पित्याने मुलगा-मुलगी भेद न मानता लाडक्या लेकीची वरात घोड्यावरून काढली. तिला धूमधड्याक्यात निरोप देण्यासह समाजाला स्त्री-पुरूष समानतेचा संदेश दिला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा खुर्द गावातील हे शेतकरी वडील असून, मुलगी मुलापेक्षा कमी नाही. ती एक नव्हे तर दोन घर प्रकाशमान करते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

नाशिकच्या अधिकाऱ्यासोबत विवाह

खर्डा खुर्द येतील शेतकरी गोवर्धन तान्हुजी सदाशिव व त्याच्या पत्नी कल्पना सदाशिव यांनी आपल्या मुलीच्या जन्मावेळीच तिच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघितली. दोन भावंडामध्ये गोवर्धन यांची मुलगी सपना मोठी झाली. तिने उच्चशिक्षण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच सपनाचे लग्न जल संसाधन मंत्रालय नाशिक येथे नोकरीवर असलेल्या प्रशिश विजय खंडारे यांच्यासोबत जुळवले. यावेळी तान्हुजी कुटूंबाने आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढण्याचे ठरविले. त्यानुसार लग्नाची तयारी केली.

पाच जूनला झाले लग्न

5 जून रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी वधू लग्नमंडपात मुलाप्रमाणे घोड्यावरून आली. घोड्यावरून जाणाऱ्या वधूची वरात बघण्यासाठी जवळपासच्या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या जिल्ह्याभर या अनोख्या लग्नाची मोठी चर्चा आहे.

उच्चशिक्षण देऊन वाढविले

गोवर्धन सदाशीव यांना दोन मुलं पंकज व धीरज आहे. त्यांनी मुलगी सपना हिलाही मुलांप्रमाणे उच्चशिक्षण दिले. गोवर्धन यांची ओळख गावामध्ये जलदूत म्हणून आहे. यापूर्वी त्यांनी उन्हाळ्यामध्ये स्वत:च्या शेतातून पाइपलाइन टाकून गावाची तहान भागवली. संपूर्ण गावाला दुष्काळ परिस्थितीमध्ये पाणी पाजले. त्यामुळे त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतिने जलदूत सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...