आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री संदीप सिंह यांच्या घरी पोलिस:महिला कोच म्हणाली, देश सोडण्यासाठी 1 कोटीची ऑफर

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाचे मंत्री संदीप सिंह यांच्यावरील लैंगिक छळ आणि वनियभंगाच्या प्रकरणात चंदीगड पोलिसांच्या एसआयटीने महिला प्रशिक्षिकेची जवळपास ८ तास चौकशी केली. महिला प्रशिक्षिका एसआयटीसमोर हजर झाल्यानंतर पत्रकारांना म्हणाली, मला देश सोडण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. ती म्हणाली, देश सोडून इतर देशात जा, एक महनि्यासाठी एक कोटी रुपये मिळतील, असे फोन काॅल येत आहेत. तक्रार मागे घेऊ नको, असे सांगितले. मात्र, गप्प राहण्यास व दुसऱ्या देशात निघून जाण्यास सांगितले आहे. ती म्हणाली, मी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य एेकले. ते स्वत: संदीप सिंह यांचा बचाव करत आहेत. चंदीगड पोलिसांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही. मात्र, हरियाणा पोलिस माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, हरियाणाचे मंत्री संदीप सिंह यांच्यावरील लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी संपूर्ण क्राइम सीन रिक्रिएट केला. पीडित महिलेचे वकील दीपांशू बन्सल म्हणाले, चंदीगड पोलिसांची एसआयटी टीम महिला प्रशिक्षिकेला संपूर्ण क्राइन सीन रिक्रिएट करण्यासाठी संदीप सिंह यांच्या घरी घेऊन गेली होती. तिथे सुमारे २५ मनििटे संपूर्ण सीन क्रिएट करण्यात आला. ते म्हणाले, ‘या प्रकरणी बुधवारी कलम १६४ अन्वये जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्काळ कलम ३७६ जोडण्यात यावे.’ कलम ३७६ अजामीनपात्र आहे. यात १० वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेप आणि दंडही होऊ शकतो. बन्सल पुढे म्हणाले, संदीप सिंह यांना तत्काळ अटक झाली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...