आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहींचा फायदा काहींना बसणार फटका:महापालिकेच्या प्रभागरचनेचे औत्सुक्य; 13 जून रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर होणार

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने 31 मे रोजी प्रभागाच्या आरक्षणाच्या सोडतीवर हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (6 जून) एकही हरकत दाखल झाली नाही. दरम्यान त्यापूर्वीही हरकत दाखल न झाल्याने प्रभाग आरक्षणाबाबतचे हरकतीचे रजिष्टर कोरेच राहिले आहे. तर आता 13 जून रोजी महापालिकेचे अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

एक जुन पासून जाहिर करण्या आलेल्या आरक्षणावर हरकती दाखल करता येणार होत्या. मात्र एक ते तीन जुन या दरम्यान एकही हरकत दाखल झाली नाही. तर शनिवार आणि रविवार सार्वजनिक सुटी आली. तर सहा जुन रोजी दुपारी तीन वाजे पर्यंत हरकती दाखल करता येणार होत्या. मात्र सहा जुन रोजी दुपारी तीन वाजे पर्यंत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता 13 जून रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

दरम्यान ओबीसींचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरु आहे. 15 जूनपर्यंत हे काम करावे लागणार आहे. या नंतर शासनाने ओबींसीच्या संख्येचा डाटा न्यायालयात सादर केल्यानंतर आणि ओबीसींसाठी आरक्षण लागू झाल्यास महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत पुन्हा घ्यावी लागणार आहे. तसे न झाल्यास अंतिम प्रभाग आरक्षण निवडणुकीसाठी लागू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...