आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सुनावनी:महापालिकेचे अंतिम प्रभाग आरक्षण आज जाहीर होणार

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका नविडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी ३१ मे रोजी प्रभागाच्या आरक्षणाच्या सोडतीवर हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दविशी साेमवारी ६ जूनला एकही हरकत दाखल झाली नाही. दरम्यान त्यापूर्वीही हरकत दाखल न झाल्याने महापालिका प्रभाग आरक्षणाबाबतचे हरकतीचे रजिष्टर कोरेच राहिले आहे. तर आता सोमवारी १३ जून रोजी महापालिकेचे अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार बुधवार एक जूनपासून जाहिर करण्यात आलेल्या आरक्षणावर हरकती दाखल करता येणार होत्या. मात्र बुधवार एक ते शुक्रवार तीन जून या दरम्यान एकही हरकत दाखल झाली नाही. तर शनविारी ४ जून आणि रवविारी पाच जूनला सार्वजनिक सुटी आली. तर सोमवारी सहा जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती दाखल करता येणार होत्या. मात्र सोमवारी सहा जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता सोमवारी १३ जून रोजी महापालिकेचे अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.याकडे शहरातील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...