आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान चिंतेचा विषय झाला आहे. वाढते तापमान कमी करण्याच्या उद्देशाने स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीचा विदर्भातील पहिला प्रयोग कापशीमध्ये राबवला जात आहे. या प्रयोगाचे उद्घाटन ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी करण्यात येणार आहे. O4U अर्थात ‘ऑक्सिजन आपल्या सर्वांसाठी’ या संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षक्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या प्रयत्नातून हे मॉडल तयार करण्यात आले आहे. स्वस्तिक मॉडेलचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोला जिल्ह्यातील कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तयार करण्यात आले आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वस्तिक मॉडेल वृक्षलागवडीचा सोहळा पार पडणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विदर्भातील पहिल्या प्रयोगाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशी होणार वृक्षांची लागवड : एकूण २०० फुटावरील परिसरात १ हजार वृक्षांचे रोपण स्वस्तिक मॉडेल अंतर्गत करण्यात येते. २ फुटानंतर एक रोप लावण्यात येते. रोपांमध्ये कमी अंतर असते. यामुळे एकमेकांशी स्पर्धा करून रोपं वेगाने वाढतात, असे यामागील विज्ञान आहे. यापूर्वी लातूर येथे हा प्रयोग यशस्वी ठरला. २५ प्रजातींच्या रोपांचा समावेश : स्वस्तिकमध्ये निम, आवळा, उंबर, बादाम, शिरस, सिसम, बेल, सिताफळ, रामफळ, कदम, आंबा, चिंच, कडूबदाम, सेमल आदी २५ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २५ रोपानंतर पुन्हा तेच रोप रोवण्यात येईल. अशी एकूण १००० रोपटी मॉडेलमध्ये रोवण्यात आली आहेत. संगोपनासाठी यशस्वी मॉडेल एक व्यक्ती हजार वृक्षांचे संगोपन करू शकत नाही. मात्र, स्वस्तिक मॉडेल अंतर्गत हे शक्य आहे. शिवाय स्वस्तिक आतील रिकाम्या जागेचा उपयोग लॉन किंवा कार्यक्रमासाठी करता येऊ शकतो. - ए. एस. नाथन, वृक्ष क्रांती मिशन, अकोला. वृक्षलागवडीसाठी तयार केलेले स्वस्तिक मॉडेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.