आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल:उद्घाटन झाल्यानंतर लगेच उड्डाणपूल खचून गेला,‎ अन् त्याच आमदारांना 30 वर्षांपासून निवडून देता?‎

अकोला‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. लगेच तो‎ खचून गेला. कोट्यवधी रुपये खर्च‎ करून जर उड्डाणपूल खचत असेल‎ आणि तो बंद करावा लागत असेल, तर‎ त्या कॉन्ट्रॅक्टरला भाजपने अटक केली‎ पाहिजे. मात्र तसे होत नाही. दोष त्यांचा‎ नाही, तुमचा आहे. कारण अशा‎ आमदारांना ३० वर्षांपासून निवडून‎ तुम्हीच देता. तुमच्या सहनशक्तीला‎ सलामच केला पाहिजे, असा उपरोधिक‎ टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे‎ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे‎ यांनी लगावला. त्या गुरुवारी सायंकाळी मोठी उमरीत शिवगर्जना‎ सप्ताहानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.‎

सुषमा अंधारे यांनी अकोल्यातील रस्ते, पाणी या विषयावर‎ भाजपचा समाचार घेतला. अकोल्याचे पालकमंत्री जर देवेंद्र‎ फडणवीस असतील तर त्यांना शहरात यायलाही वेळ नाही,‎ यापेक्षा दुर्भाग्य काय म्हणावे असे त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे‎ मुख्यमंत्री असताना त्यांनी अकोल्याला तेराशे कोटी रुपये दिले.‎ या लोकांनी काय केले जाब विचारला पाहिजे. या जिल्ह्यातून केंद्रीय शिक्षण मंत्री झाले. त्यांनी अकोल्याला काय‎ दिले येथील लोकांसाठी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.‎ भाजपची माणसं महापुरुषांचा अवमान जाणूनबुजून करत आहेत. ही‎ माणसं ठरवून बोलतात कारण त्यांना महापुरुषांना मोडीत काढून हेडगेवार‎ आणि गोळवलकरांना स्थापित करायचे आहे. त्यांच्या या राजकारणाला‎ पराभूत करायचे असेल तर एकीची वज्रमूठ बांधावी लागेल, असेही‎ अंधारे म्हणाल्या. सभेला उत्तर महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुख शुभांगी पाटील,‎ जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, जिल्हा संघटक विजय दुतोंडे, युवा‎ आघाडी प्रमुख अजय खुमकर, महानगर प्रमुख राहुल कराळे, देवश्री‎ ठाकरे, मुकेश मुरूमकार, अतुल पवनीकर, मंगेश काळे, वर्षा पिसोळे‎ यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.‎

भावना गवळींना मोदींनी क्लीनचिटची ओवाळणी दिली का?
वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप किरीट‎ सोमय्या यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी‎ गवळींना माफिया म्हटले होते. ते किरीट सोमय्या आता कुठे गेले.‎ रक्षाबंधनाच्या दिवशी याच भावना गवळींनी पंतप्रधान मोदी यांना राखी‎ बांधली तेव्हापासून त्यांना क्लीनचिट मिळाली. म्हणजे भावना गवळींना‎ मोदींनी क्लीनचिटचीच ओवाळणी दिली का, अशीही टीका सुषमा अंधारे‎ यांनी केली.‎ देवेंद्र यांची आसुरी सत्ताकांक्षा मोठी आहे : देवेंद्र फडणवीस‎ यांच्यावर सुषमा अंधारे यांनी लक्ष्य केले. फडणवीसांवर टीका करताना‎ त्या म्हणाल्या की, देवेंद्र यांची आसुरी सत्ताकांक्षा मोठी आहे. सहा‎ जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वत:कडे ठेवून सर्व महत्त्वाची खाती त्यांनी‎ स्वत:कडे ठेवली आहेत. ज्या अजय आशेर नामक बिल्डरला त्यांनी मित्र‎ आयोगावर घेतले, ते अजय आशेर यांनी मुंबईहून सुरत आणि सुरतहून‎ गोवा असा प्रवास त्यांच्या गाड्यांतून आमदारांना घडवला त्यांना‎ फडणवीसांनी बक्षिसी दिली का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.‎

बातम्या आणखी आहेत...