आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अकोट येथे सराफा बाजारातील इमारतीची गॅलरी कोसळली ; साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली

अकोट19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे येथील सराफा बाजारातील इमारतीची गॅलरी कोसळली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. येथे सराफा बाजारात बालाजी मार्केटची जुनी इमारत आहे. तिच्या गॅलरीत उन्हापासून बचावासाठी ग्रीननेट बांधली होती. शनिवारच्या वाऱ्यामुळे ही ग्रीननेट उडत होती. त्यामुळे इमारतीला हादरा बसल्याचा भास येथील लोकांना होऊ लागला. इमारतीतील लोकांचे गॅलरीकडे लक्ष गेले. या वेळी गॅलरीच्या काही टाईल्सला भेगा पडत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे काही वेळ लोकांची धावाधाव झाली. काहीवेळात या गॅलरीतील पुढील टाइल्स उखडून कोसळली. या घटनेमुळे काही वाहनांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वृक्षही उन्मळून पडले : शहरात वादळी वाऱा, पावसामुळे यात्रा चौक परिसरात कडू लिंबाचे झाड पडले. बसस्थानक परिसरात विद्युत खांब, तारांवर वृक्षांच्या फाद्या कोसळल्या. शहरात अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी गॅलरी, घराबाहेर ग्रीन नेट लावल्या. मात्र पावसाळा सुरू झाला असून, वादळी वाराही वाहत आहे. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...