आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • The Government Will Send A Proposal For The Development Of Three Major Roads In The City; The General Assembly Gave Approval To Various Issues Including Enumeration Of Gaothan Area | Akola Marathi News

विकास कामे:शहरातील तीन प्रमुख रस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार; महासभेने गावठाण भागाच्या मोजणीसह विविध विषयांना दिली मंजुरी

अकोला7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तीन प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभीकरणासाठी रस्ते विकासाचा प्रस्ताव तीन योजनांमध्ये शासनाकडे पाठवण्याचा प्रस्ताव महासभेने मंजुर केला. या ऑनलाईन सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.शहरातील चांदेकर चौक ते फतेह चौक ते दामले चौक ते मालधक्का, अग्रसेन चौक ते दामले चौक ते शहिद अब्दुल हमीद चौक तसेच कॅनॉल मार्ग या तीन प्रमुख मार्गाचे रुंदीकरण, दुभाजक, नाल्या बांधणे आदी कामांसाठी नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसह विविध योजनेतुन निधी मिळण्यासाठी या आशयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे प्रस्ताव विजय अग्रवाल यांनी महासभेत मांडला.

या विषयावर बोलताना विरोधी पक्षनेते डॉ.झिशान हुसेन म्हणाले, मागील पाच वर्षापासून या रस्त्याची कामे रखडली आहे. आता जाग आली. त्याबद्दल अभिनंदन. तर शिवसेनेचे राजेश मिश्रा म्हणाले, सत्ताधाऱ्यांना शेवटच्या क्षणी रस्ते विकासाची आठवण आली. मात्र याच रस्त्यांसोबत डाबकी रोडच्या रुंदीकरणाचे काम घ्यावे. या रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणात झाली असून वाहतुक जाम होते. तर अनेक सदस्यांनी त्यांच्या -त्यांच्या प्रभागातील रस्त्याचा कामाचा समावेश करावा, अशी मागणी केली. चर्चा झाल्या नंतर सर्वोनुमते हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.

याच सभेत शहराची मुळ हद्द व वाढीव हद्दीतील अंर्तभूत गावठाणच्या आतील भागांची मोजणी खासगी सर्व्हेअर कडुन घेण्याचा प्रस्ताव, शहरात झोन निहाय मटण मार्केट बांधणे, बॅकेला महापालिका कार्यालय परिसरात एटीएमसाठी जागा देणे, शहरातील व्यायाम शाळांना व्यायाम साहित्य खरेदी करणे, नविन व्यायाम शाळा बांधणे यासाठी प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठवणे आदींसह विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. सभेत सुमनाताई गावंडे, हरीश आलीमचंदानी, गजानन चव्हाण, सपना नवले, महंमद इरफान, पराग कांबळे, आशिष पवित्रकार, राहुल देशमुख, अनिल मुरुमकार, सिद्धार्थ शर्मा आदी विविध सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

निधी कुणाचा यावरुन वादविवाद
महाविकास आघाडीने शहर विकासासाठी निधी दिला. हा निधी महाविकास आघाडीचा आहे, असे राजेश मिश्रा म्हणाले. यावर सिद्धार्थ शर्मा म्हणाले, निधी महाविकास आघाडीचा नाही तर जनतेचा आहे. यावर महंमद इरफान म्हणाले, जर शासनाने दिलेला निधी जनतेचा आहे. तर निधी वाटपात भेदभाव का केला जातो.

बातम्या आणखी आहेत...