आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूजलाची पातळी वाढणार:शहरात 138 शोषखड्ड्याचे काम पूर्ण; मुरुमाड भागात अधिक शोषखड्डे

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने भुजलाच्या पातळीत वाढ व्हावी, यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात आतापर्यंत 138 शोषखड्डे तयार केले आहेत. दरम्यान नागरिकांनीही आपल्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुजलाचा सतत उपसा करण्यात आला. तुलनेने पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शासनाने भूजलवाढीसाठी विविध योजना आखल्या. मात्र या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रमाणात झाली नाही. त्यामुळे आता भूजलाची पातळी चिंताजनक परिस्थितीत पोचली आहे. 400 ते 500 फुट खोली पर्यंत भुजल निघत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे या शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

या अनुषंगानेच शासनाने दोन वर्षापूर्वी महापालिकेला 65 लाख रुपयाचा निधी दिला. यातून शोषखड्ड्याचे कामे केले जाणार होते. तसेच मनपा मालकीच्या विविध इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिग योजना राबवली जाणार होती. मात्र शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामामुळे प्रशासनाने या महत्वाच्या कामाकडे लक्ष दिले नाही. मात्र आता महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात शोषखड्डे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहराच्या ज्या भागात जमिनीत मुरुम आहे, त्या ठिकाणी शोषखड्डे अधिक प्रमाणात करण्यात आले तर काळी माती असलेल्या भागातही शोषखड्डे करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिली.

भुजलाची पातली वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर कोसळणारे पावसाचे जमिनीत जिरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

असा तयार करण्यात शोषखड्डा

दोन मिटर बाय दोन मिटरचा राऊंड तसेच दोन मिटर खोल खड्डा. या खड्ड्यात 100 फुट खोल बोअर घेवून या बोअरच्या पाईपला होल करुन पाईपच्या आजू बाजूने मोठे, दगड, विटाचे तुकडे, गिट्टी, रोडी आणि रेतीचा थर देण्यात आला आहे. या शोषखड्ड्यात पाणी गेल्या नंतर ते पाईपला असलेल्या होल मधुन आत जमिनीत जिरते.

बातम्या आणखी आहेत...