आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्यादान:पालकमंत्र्यांनी केले ‘त्या’ मुलीचे कन्यादान ; बाळापुरात सोहळा, मुरलीधर राऊत यांचा पुढाकार

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गा या मुलीचे वडिल भास्करराव तराळे (रा. व्याळा ता. बाळापूर ) आणि आई प्रमिला या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते. तिचे मेव्हणे व मामा यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले. कंचनपूरचे (खामगाव ) विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रवीण यांच्या स्थळाचा होकार आला. लग्न सभारंभासाठी व्याळाजवळील हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत यांनी पुढाकार घेतला. राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्यातर्फे करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न झाले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. विवाह सोहळ्यासाठी हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत, अमोल जमोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...