आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका क्षेत्रात हॉकर्स झोन निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रशासनाचा फटका, अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत चार चाकी गाड्या लागु नयेत, यासाठी सोमवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना खुले नाट्यगृह ते फतेह चौक या मार्गावर सतत तीन तास उभे राहावे लागले. यामुळे मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उभे राहुन कर्तव्य बजावणार की प्रशासन हॉकर्स झोनकडे लक्ष देणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे.
शहरातील विविध मार्गावर लघु व्यावसायीक चारचाकी गाड्या लागून व्यवसाय करतात. महापालिका अस्तित्वात येवून २३ वर्ष होत आले असले तरी आता पर्यंत कोणत्याही आयुक्तांनी हॉकर्स झोन निर्मितीचा ठोस प्रयत्न केला नाही. प्रत्येकाने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. मात्र प्रत्येक वेळी अतिक्रमण हटाव मोहिम फार्स ठरते. यामागे अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा प्रशासन अधिक जबाबदार आहे. कारण जो पर्यंत हॉकर्स झोन निश्चित करुन या लघु व्यावसायिकांना जागा दिल्या जात नाहीत. तो पर्यंत अतिक्रमण हटाव मोहिम फार्स ठरणार आहे. हॉकर्स झोन निश्चित केल्या नंतर लघु व्यावसायीकांनी रस्त्यावर चारचाकी गाड्या लावल्या नंतर कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु असे न झाल्याने तिसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण मोहिमेत अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे राहावे लागले. सोमवारी खुले नाट्यगृह ते फतेह चौक ते टॉवर आणि फतेह चौक ते दीपक चौक या मार्गावर मोहिम राबविण्यात आली.
या मार्गावरील अतिक्रमीत हात गाड्या, ठेले, दुकाना समोरील ओटे, शेड तसेच कच्च्या स्वरूपाचे अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्वप्नील शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल राजीक, शोभा इंगळे, सविता सगळे, स्वप्नील पवार, धिरज पवार, पवन चव्हाण, सोनु गायकवाड, मनपा विद्युत विभागाचे विजय यादव, महेंद्र रोकडे, हरिहर घोडके, मनोहर मसके, गजानन मेंगे, गजानन बोरडे व अभिकर्ता चे अजिंक्य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी केली.
दररोज अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे करणार का?
रस्त्या लगत चारचाकी गाड्या पुन्हा लागु नयेत. यासाठी अधिकाऱ्यांना रस्त्यावर उभे राहावे लागले. एकदा उभे राहिल्याने दुसऱ्या दिवशी या ठिकाणी चारचाकी गाड्या लागणार नाहीत, अशातला भाग नाही. त्यामुळे प्रशासन या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हॉकर्स झोनकडे दुर्लक्ष करुन दररोज रस्त्यावर उभे करणार का? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.