आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:मंगल कार्यालयासंदर्भात आता 22 जुलै रोजी होणार सुनावणी

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मंगल कार्यालये-लॉन मध्ये २२ जुलै पर्यंत विवाह आदी कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडणार आहेत. यापूर्वी ३० मार्च व १० मे रोजी राष्ट्रीय हरीत प्राधिकरणा समोर ऑनलाइन झालेली सुनावणी पूर्ण होवू शकली नाही. त्यामुळे आता ही सुनावणी २२ जुलै रोजी होत आहे. मंगल कार्यालय संचालकांचे लक्ष आता लवादाच्या निर्णयाकडे लागले आहे. शहरात एका मंगल कार्यालयासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित मंगल कार्यालयाकडे पार्किंगची व्यवस्था नसल्याने,समारंभामुळे होणारा त्रास आदी बाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्या गेल्याने संबंधित व्यक्तीने दिल्लीतील राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाकडे तक्रार केली. यावरुन प्राधिकरणाने पर्यावरणाच्या अनुषंगाने निकषाचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगीतले. प्राधिकरणाच्या या सूचनेवरुन ही कारवाई सुरू केली होती. परिणामी अनेकांचे विवाह आदी कार्यक्रमांवर संक्रात आली होती. महापालिकेने संबंधितांकडून हमी पत्र घेवून सील उघडले होते. या विरोधात तक्रारकर्त्याने लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आतापर्यंत ११ फेब्रुवारी, ३० मार्च, १० मे रोजी ऑनलाइन सुनावणी झाली. परंतु ही सुनावणी पूर्ण होवू शकली नाही. आता ही सुनावणी २२ जुलै रोजी होत आहे. लवादाने संपूर्ण नियमांचे पालन करण्याचे आदेश मंगल कार्यालये, लॉन आदींना दिल्यास २२ जुलै नंतर आयोजित विवाह सोहळे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी लवादाच्या आदेशान्वये शहरातील मंगल कार्यालये, लॉन आदींना सील लावण्यात आले होते. आता लवादासमोर पुन्हा सुनावणी सुरू आहे. २२ जुलै रोजी या प्रकरणात लवादाने मंगल कार्यालयांना सर्व निकषांचे पालन करण्याचे आदेश दिल्यास िववाह सोहळे अडचणीत येतील. दरम्यान जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये फारसे विवाह होत नाही. मात्र दिवाळीनंतर होणारे विवाह अडचणीत येवू शकतात. शहरातील सभागृहांची संख्या मंगल कार्यालये ः ७४ लॉन ः १८ हॉटेल्स,रेस्टारंट (विवाह समारंभाचे) ः १४