आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्यपणे जून महिन्यात उन्हाची प्रखरता कमी होऊन व पावसाचे आगमन होऊन दिलासादायक वातावरण तयार होते. मात्र यंदा जूनच्या सुरुवातीपासून अकोलेकरांना असह्य चटके सहन करावे लागत आहेत. शनिवारी 4 जून राेजी 44.2 अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविले गेले. दरम्यान यापूर्वी 1 जून 1923 राेजी अकोल्याचे तापमान 47.2 अंशांवर होते. आतापर्यंतच्या जून महिन्यातील ही विक्रमी नोंद असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात येते.
सामान्यपणे पंधरा जून ही अकोला जिल्ह्यासाठी मान्सूनच्या आगमनाची तारीख असते. त्यामुळे जून महिन्यातील प्रारंभीचे दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतो. त्यानंतर तापमानात घट होऊन जिल्ह्यात जिल्हा साहाय्यक परिस्थिती निर्माण होते. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातील तापमान सरासरी 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहते. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या जूनमधील सर्वाधिक तापमान 47.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले आहे. ही नोंद 1 जून 1923 मधील आहे. जिल्ह्यातील किमान तापमानाची विक्रमी नोंद पाहिली तर 24 जून 2003 रोजी 19.8 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदविले गेले होते.
यंदाची तापमानात वाढ
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान 43 अंश सेल्सियसच्या वर राहत आहे. शनिवारी 4 जून राेजी कमाल तापमानात पुन्हा वाढ होऊन 44.2 अंश एवढी नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.