आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा पंधरवड्यात महावितरणने दिल्या 58 हजार नवीन वीजजोडण्या:राज्य शासनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ 15 दिवसांत 58 हजार 457 घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या 44 हजार 669 ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज या पंधरवाड्यात निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने 100 टक्के उद्दीष्ट साध्य केले आहे.

17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण या पंधरवड्यात करण्यात यावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन वीजजोडणी सोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अशी आहे अर्जाची प्रक्रिया

नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. क्षेत्रीय स्तरावर सप्टेंबरपर्यंत पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या 58 हजार 457 नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवाड्यात सर्व ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देऊन 100 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

  • औरंगाबाद 9 हजार 528
  • कोंकण 25 हजार 685
  • नागपूर 14 हजार 975
  • पुणे 9 हजार 673 नवीन

याशिवाय ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी 44 हजार 669 ग्राहकांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून या सर्व ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहे. ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत 3 हजार 285, कोंकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत 20 हजार 283, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत 6 हजार 300 आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत 14 हजार 801 ग्राहकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...