आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरारी:अक्षरओळख पासून इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रेरणादायी प्रवास; गायत्री बालिकाश्रमातील विद्यार्थिनींची भरारी

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गायत्री बालिकाश्रमातील चार मुलींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितून १० वीच्या परीक्षेत भरारी घेतली आहे. आई-वडीलांचे छत नसलेल्या परंतु, गुणांनी हुशार असलेल्या ४ बालिका काजल बनसोड, आरती धुर्वे, मुस्कान खान, निताली गवई या उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाल्या आहेत.

या चारही मुली खडतर जीवन जगत असताना बालिकाश्रमात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना त्यांचे नावही लिहीता येत नव्हते, शाळा काय आहे? हे माहित नव्हते. अशा मुलींनी आज स्वतःची जिद्द,आश्रमात मिळालेल्या संस्काराच्या आधारावर दहावीची परीक्षा पास केली आहे. कोरोनात बंद पडले होते शिक्षण, पण जिद्द, चिकाटी ठरली महत्त्वाची आरती सुरेश धुर्वे (७६ टक्के)हिचे आई- वडील हयात नाहीत.

लहानपणापासून आरती आजी, आजोबा, मामाकडे लहानाची मोठी झाली. आरतीला अभ्यासाची आवड असल्याने ती अकोट येथील आश्रम शाळेत शिकत होती. कोरोना काळात ही आश्रम शाळा बंद होती. ती घरी आजी, आजोबा, मामांकडे गेली. त्यावेळी आई वडील नसलेल्या आरतीला काही विपरीत कारणास्तव आश्रम शाळेच्या शिक्षकांनी चाइल्ड लाइनद्वारे बाल कल्याण समितीच्या आदेशाने दीड वर्षापूर्वी गायत्री बालिकाश्रमात दाखल केले. त्यावेळी बालिकाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी आरतीची शिक्षणाची आवड व जिद्द बघता तिला अभ्यासाची व्यवस्था करुन दिली. तिला पेपरला अकोटला जावे लागत होते. त्यासाठी बाल कल्याण समितीची परवानगी मिळवून दिली. आरतीला शिकवणी नसताना स्वभ्यासाने तिने चांगले गुण घेतले. आरतीला विज्ञान शाखेत प्रवेश घेवून बी.एस्सी करायचे आहे.

प्रतिकुल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत भरारी घेणाऱ्या विद्यार्थिनी.
अभ्यास करून गायन आणि नृत्यातही घोडदौड मुस्कान सलिम खान (६५ टक्के) ही लहानपणापासून आश्रमात लहानाची मोठी झाली. तिला आई-वडील नाही. मुस्कानला अभ्यासाची, गायनाची आवड आहे. ती डान्स कोरीयोग्राफर सुद्धा आहे. मुस्कानच्या अभ्यासाची, गायनाची आवड लक्षात घेता तिला स्वामी विवेकानंद शाळेत प्रवेश दिला होता. तिला गायनाचे वर्ग लावले आहे. मुस्कान खानला विज्ञान शाखेत प्रवेश घेवून बी.एस्सी करायचे आहे

बातम्या आणखी आहेत...