आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा योजना स्थगितीचा मुद्दा पेटणार:खारपाणपट्यातील 69 गावातील खारे पाणी उपमुख्यमंत्र्यांना देण्यासाठी दिंडी नागूपरकडे जाणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना टँकरने देणार धडक - Divya Marathi
शिवसेना टँकरने देणार धडक

बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गावं प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विराेधात साेमवारी शिवसेनेकडून पायी दिंडी काढण्यात येणार आहे. यासाठी गत काही दिवसांपासून 69 गावातील खारे पाणी जमा करण्यात येत असून, हे पाणी टँकरमधून नागपूर दिंडीतून नेण्यात येणार आहे. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याची आणि त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती ग्रामस्थ व शिवसैनिक करणार आहेत.

तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला. मात्र आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानंतलही त्यांनी जिल्ह्यातील याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. याविराेधात आता वातावरण तापले असून, या याेजना खेचून आणणलेल्या शिवसेनेकडून ग्रामस्थांना घेऊन अकाेला ते उपमुख्यमंत्री राहत असलेल्या नागपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख जि.प. गट नेते गाेपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवानकी, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा आदींनी कळवले आहे

अशी आहे सद्यस्थिती

  • 69 गावे पाणी पुरवठा याेजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. 43 कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियाेजन आहे. त्यापैकी 27 कि .मी.अंतरापर्यंत मुख्य जलवािहनी टाकण्यात आली आहे.
  • अंतर्गत 228 पैक 108 कि.मी. अंंतरापर्यंत जलवािहनी टाकण्यात आली आहे.219 काेटींच्या या याेजनेवर आतापर्यंत 125 काेटींचा खर्च झाला असून, 92 काेटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत.

असा हाेणार श्रीगणेशा

  • पायी दिंडीचा श्रीगणेशाला 10 एप्रिल राेजी सकाळी 7 वाजता अकाेल्यातील राजेश्वर मंदिरापासून हाेणार आहे. राजेश्वराला जलभिषेक करून दिंडी निघेल.
  • दिंडी जयहिंद चाैक, महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली),गांधी चाैक, मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), टाॅवर चाैक, रतनलाल प्लाॅट चाैक, जठारपेठ, उमरी, गुडधीमार्गे घुसकडे रवाना हाेईल.
  • दिंडीचे नागपूरपर्यंत 9 ठिकाणी मुक्काम राहणार हे. पहिला मुक्काम अंबिकापूर येथे तर शेवटचा मुक्काम 19 एप्रिल राेजी नागपूर जिल्ह्यातील धामना येथे राहणार आहे. त्यानंतर 21 तारखेला उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दिंडी पाेहाेचणार आहे.