आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील राजेश्वर सेतू:जागेचा मोबदला टीडीआर स्वरुपात दिला; आता रस्त्याचे काम केव्हा? नागरिकांचा प्रश्न

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने आरक्षित केलेल्या एक एकर जागेचा मोबदला टीडीआर स्वरुपात महापालिकेने संबंधित जमिन मालकाला दिला. त्यामुळे राजेश्वर सेतु पुलावरुन थेट सरकारी बगीच्या मार्गाला पोचण्यासाठी रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला. मात्र हा रस्ता केव्हा तयार होणार? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु आहे.

महापालिकेने शहर विकास आराखड्यात मोर्णा नदीवर असदगड (किल्ला चौक) ते सरकारी बगीच्या बाजूने पुलाची नोंद केली आहे. या पुलासाठी सरकारी बगीच्याच्या बाजुची खासगी जागा महापालिकेने आरक्षित केली होती. मात्र जागेचे रोख मुल्य देणे महापालिकेला शक्य नसल्याने टिडीआर स्वरुपात हा मोबदला देण्याचे निश्चित करण्यात आले. अनेक वर्षापासून टिडीआर देण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी हा टिडीआर संबंधित जमिन मालकाला दिला. त्यामुळे ही जागा आता महापालिकेच्या ताब्यात आली आहे. ही जागा केवळ मोर्णा नदीवरील पाचव्या पुलासाठीच कामी येणार नसुन मोर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या राजेश्वर सेतु (पुल)साठीही कामात येणार आहे.

राजेश्वर सेतुवरुन सरकारी बगीच्या मार्गावर गल्लीबोळातून जावे लागते. त्यामुळे या पुलावरुन केवळ दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात आलेला आहे. मात्र महापालिकेने ताब्यात घेतलेली जागा ही राजेश्वर सेतू पुलासमोरच आहे. त्यामुळे या जागेत रस्ता तयार केल्या नंतर राजेश्वर सेतुवरुन गल्लीबोळातून सरकारी बगीच्या मार्गावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळेच आता जागा ताब्यात आल्याने या जागेतून सरकारी बगीच्या रस्त्यापर्यंत रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. जी जागा महापालिकेने ताब्यात घेतली, त्या जागेचा मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे आता रस्त्याचे काम केव्हा सुरु होणार? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे.

दरम्यान प्रशासनाने या महत्वाच्या जागेचा टीडीआर दिला मात्र गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणात घेतलेल्या जागेचा अद्याप टीडीआर दिलेला नाही त्यामूळे या जागेचा टीडीआर केंव्हा दिला जाणार, अशी चर्चाही सुरू आहे

बातम्या आणखी आहेत...