आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी रेल्वे स्थानकावर शालीमार एक्सप्रेसमधून एक चार वर्षीय बालक आईवडिलांसह प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुद्धबाजूने खाली उतरला. अचानक हा बालक रेल्वेच्या खालून प्लॅटफॉर्मकडे येवू लागला. इतक्यात गाडी सुरु झाली. मात्र प्रसंगावधान राखत गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे खालून वर ओढले व त्या बालकाचा जीव वाचला.
५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अकोला स्थानकावर शालीमार एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्र. १ वर येवून थांबली. याच गाडीतून एक दिव्यांग हा पत्नी, चार वर्षाच्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुद्ध बाजूने खाली रेल्वे ट्रॅकवर उतरले होते.
ही रेल्वे पुढील स्थानकाकडे निघण्यासाठी तयार असताना त्यांचा लहान ४ वर्षांचा मुलगा अचानक रेल्वेच्या खालून प्लॅटफॉर्मकडे येवू लागला. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर गस्तीवर असलेले पोलिस दिलीप जाधव व गोपाल सोळंके यांनी प्रसंगावधान दाखवून, या लहान बालकाला प्लॅटफॉर्मवर खेचले. त्यानंतर अवघ्या १० सेकंदात रेल्वे पुढील स्थानकासाठी रवाना झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.