आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. प्राथमिक सर्वेक्षणात ११५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असून, १९० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून भरीव मदत त्वरित न मिळाल्यास आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. अवकाळी पावसाचा फटका पातूर, अकाेट, तेल्हारा तालुक्यातील फळबागा व पिकांना बसला आहे. एकीकडे हाेळीचा जल्लोष करताना शहरी भागात नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले हाेते, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रचंड पाऊस झाला हाेता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना धोका दिला हाेता.
असा बसला फटका...
बाळापूर तालुक्यातील हातरूण, नया अंदुरा या भागातील मालवाडा, शिंगाेली, लाेणाग्रा, बाेरगाव, हातला, कंचनपूर या भागात पाऊस झाला. परिणामी साेंगून ठेवलेला हरभरा आेला झाला असून, काही ठिकाणी शेतात हरभरा पिकाचे नुकसान झाले.कवठा बहाद्दुरा, आलेगाव, आगर, लाेहारा या भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी कांदा व हरभरा काढणीला वेग आला असून अवकाळी पावसामुळे पिकांची हानी झाली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. परिणामी शेतात हरभरा सांगणीच्या सुरु असलेल्या कामातही व्यत्यय निर्माण झाला. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला व परिसरातील कांदा, गहु हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान झाले. गहू जमिनीवर झोपला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.