आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालयी शहीद स्मारक येथे शनिवारी विशेष सभा घेण्यात आली. दरवर्षी २० ऑगस्टला हा कार्यक्रम घेण्यात येतो. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यापीठाचे सर्व संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विद्यापीठ अभियंता, कुलसचिव, विद्यापीठ ग्रंथपाल, विद्यापीठ नियंत्रक, विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. भाले यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने शहीद स्मारकाला वंदन करत शहिदांना पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलिस विभागाच्या वतीने बिगुल वाजवून व सामूहिक मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन, सद्भावना शपथ घेत साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे यांच्या मार्गदर्शनात मंजूषा देशमुख, विलास इरतकर, रोहित तांबे व अन्य सहकारी यांनी परिश्रम घेतले. त्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ सुरक्षा विभाग यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग, पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करत शहिदांना वंदन केले.

शहिदांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भात व्हावी याकरिता सन १९६८ मध्ये प्रचंड मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्टला अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. विद्यापीठ आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली.

बातम्या आणखी आहेत...