आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • The Medicinal Properties Of Spice Crops Need To Be Demonstrated; Turmeric Growers And Exporters Meet In Wardha District | Akola Marathi News

डॉ. होमी चेरियन यांचे प्रतिपादन:मसाला पिकांचे औषधी गुणधर्म प्रदर्शित करणे गरजेचे; वर्धा जिल्ह्यात हळद उत्पादक, निर्यातक मेळावा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेती अधिक फायदेशीर होत शेतकरी शाश्वत होण्यासाठी जागतिक बाजारपेठांचा आढावा घेणे काळाची गरज असून कोविडच्या पार्श्वभूमीवर मसाला पिकांची औषधी गुणधर्म संपूर्ण विश्वासमोर प्रदर्शित करणे कालसुसंगत असल्याचे मत सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकतचे संचालक डॉ. होमी चेरियन यांनी वर्धा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले. उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत, केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक उद्यानिकी विकास मिशन अंतर्गत हळद उत्पादक आणि निर्यातकांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी डॉ. चेरियन प्रमुख पाहुणे होते. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील ग्राम गिरड येथील मगन संग्रहालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. तर अधिष्ठाता कृषी डॉ. ययाति तायडे, अधिष्ठाता उद्यान विद्या तथा प्रकल्पाचे नोडल ऑफिसर डॉ. प्रकाश नागरे, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नागपूर डॉ. देवानंद पंचभाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा अनिल इंगळे, विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉ. अरविंद सोनकांबळे आदींसह एकात्मिक उद्यानिकी विकास मिशन प्रकल्पाचे विद्यापीठ प्रकल्प समन्वयक प्रा. डॉ. वजिय काळे यावेळी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विदर्भामध्ये हळदीची प्रत आणि हळदी पिकाखालील क्षेत्रवाढ लक्षात घेता हळद प्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण होत प्रक्रिया उद्योगांसाठी मोठा वाव असल्याचे सांगितले. डॉ. प्रकाश नागरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी डॉ. प्रकाश नागरे यांचे नेतृत्वात विभागप्रमुख भाजीपाला शास्त्र विभाग डॉ. अरविंद सोनकांबळे, प्रकल्प समन्वयक डॉ. वजिय काळे, सह प्रा. अभय वाघ, डॉ. बावकार आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...