आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मनपाच्या मुळ, हद्दवाढीच्या एकत्रित विकास योजनेची बैठक पुढे ढकलली

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मुळ तसेच हद्दवाढ भागाच्या एकत्रित विकास योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. या अनुषंगाने २१ जुन रोजी या विकास योजनेच्या कामाची आढावा बैठक आयोजित केली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली.

नगरपालिका असताना १९९१ रोजी शहराची हद्दवाढ झाली होती. यात कौलखेड पूर्ण गाव तसेच खडकी, मलकापूर, उमरी आदी गावातील काही भागाचा नगरपालिकेत समावेश करण्यात आला. तर २०१६ मध्ये महापालिकेची हद्दवाढ झाली. यात २१ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. महापालिकेची मुळ हद्द तसेच वाढीव भागातील विविध स्तरावरील समस्या, त्या अनुषंगाने विद्यमान सोयी सुविधा आणि अपेक्षित सोयी सुविधांबाबत शासकीय कार्यालयाचे विभागा प्रमुख, शहरातील राजकीय पदाधिकारी, विविध विषयाचे तज्ज्ञ तसेच शहरातील सर्व सामान्य नागरिक यांच्या सोबत अकोला महापालिका आणि नगर रचना विकास योजना विशेष घटक पवईचे उपसंचालक यांच्या विद्यमाने २१ जुन रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम शहराची पाहणी करुन सकाळी १०.३० पासून ही बैठक सुरु होणार होती. या बैठकीचा समारोप सायंकाळी सहा वाजता होणार आहे. ही बैठक नेमकी पुढे केव्हा होणार? याबाबत तारीख निश्चित झाल्या नंतर कळवण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

बातम्या आणखी आहेत...