आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद, स्थायी समितीच्या सभेत विराेधक आक्रमक:पदाेन्नतीच्या मुद्दावर घमासान हाेण्यापूर्वीच सभा गुंडाळली!

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी व प्रशासनाच्या वादामुळे रखडलेल्या पदाेन्नतीच्या मुद्दावर घमासान हाेण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या स्थायी समितीची मंगळवारी गुंडाळण्यात आली. शिवसेनेने शिक्षण विभागाला माहिती मागितली. मात्र हि माहिती सभागृहासमोर मांडण्यात येण्यापूर्वीच सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

गत काही दिवसांपासून शिक्षण विभागातील पदाेन्नती प्रकरणी जि.प. अध्यक्षा-उपाध्यक्ष विरुद्ध प्रशासन असा समना रंगला आहे. तिन्ही बाजूंनी ऐकमेकांना पत्र पाठविण्यात आली. पदाेन्नती प्रक्रियेची फाईल (नस्ती) उपाध्यक्षांनी स्वत:कडे ठेवून घेतल्याने पदाेन्नती समिती सभा झाली नाही.

पदाेन्नतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहिल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष पाठवलेल्या पत्रात नमूद केले हाेते. अशातच अध्यक्षांनी शिक्षण िवभागाला याप्रक्रियेची चाैकशी करण्याचा आदेश दिला. दरम्यान या मुद्दावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेने माहितीची मागणी केली. मात्र शिक्षण िवभागाकडे पुरेशी मािहती नव्हती. त्यामुळे मािहती मागविण्यात यावा, असे विराेधक म्हणाले.

मात्र सभेत माहिती सादर हाेण्यापूर्वीच सभा संपली. सभेला अध्यक्षा प्रतिभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, सभापती स्फूर्ती गावंडे, आकाश सिरसाट, पंजाबराव वडाळ, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य चंद्रशेखर चिंचाेळकर, गजानन पुंडकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...