आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य विज्ञान अभियंत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या एमएचटी-सिईटी सामाईक प्रवेश परीक्षा-२०२२ चे ५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत दोन सत्रात आयोजन केले आहे. जिल्ह्यातील चार उपकेन्द्रावर परीक्षा होणार आहे. केंद्रावर जिल्ह्यातील एकूण १६ हजार ९१६ परीक्षार्थीचे नियोजन केले आहे, अशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
एमएचटी-सिईटी सामाईक प्रवेश परिक्षा सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूरचे एस. आर. पाटील, शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूरचे पी.डी.पाटील हे जिल्हा संपर्क अधिकारी तसेच केंद्र प्रमुख एम.आर.ई.जि.एस ज्यु.इंजिनियर अकोलाचे गुंज राठोड व जिल्हा परिषद उपविभागीय ग्रामिण पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता जयंतीलाल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, बाबुळगाव या परीक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे ३८५० तर पीसीबी ग्रुपचे ४२०८ विद्यार्थी, मानव स्कुल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी व्याळा या परीक्षा केंद्रावर पीसीबी ग्रुपचे १७९८ विद्यार्थी, संतोष कुटे एक्सामिनेशन सेंटर अकोला या परीक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे २३३ तर पीसीबी ग्रुपचे ११९९ विद्यार्थी व श्री इनफोटेक कापसी या परिक्षा केंद्रावर पीसीएम ग्रुपचे २६९१ तर पीसीबी ग्रुपचे २९३७ विद्यार्थी असे एकूण १६९१६ परीक्षार्थी उपस्थित राहणार आहे. परीक्षेकरीता विद्यार्थ्यांनी नियोजीत वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे. ॲडमिट कार्ड व ओरिजनल ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच संबंधित परिक्षा केन्द्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.